नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजित वंजारींचे शक्तिप्रदर्शन; महाविकास आघाडीच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल.

0
IMG-20261005-WA0201
Spread the love

IMG 20261005 WA0208

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित प्रचार सभेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला. पदवीधरांच्या विविध प्रश्नांना आणि अपेक्षांना प्राधान्य देत त्याबाबत प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे नामांकनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे.
आगामी काळात पदवीधर मतदारांचे प्रश्न, अपेक्षा आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणे यामुळे निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!