धोबी समाजाच्या आरक्षणासाठी संविधान चौकात एल्गार!

0
IMG-20261101-WA0099
Spread the love

 

ऐतिहासिक पुरावे व समित्यांच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी; नागपूरमधील साखळी उपोषणाला चामोर्शी संघटनेचा दमदार पाठिंबा!

चामोर्शी ,दि.३१ ऑक्टोबर : धोबी (परीट) समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नागपूर येथील संविधान चौकात २७ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू आहे. ऐतिहासिक पुरावे आणि डॉ. भांडे समितीच्या शिफारशी असूनही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने समाजबांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डॉ. भांडे समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच धोबी, परीट, वरठी, रजक आदी समाजघटकांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी स्वतंत्र शासन निर्णय (जी.आर.) काढण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

या आंदोलनाला चामोर्शी तालुका धोबी (परीट) समाज संघटनेने सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख डी. डी. सोनटक्के यांच्या उपस्थितीत चामोर्शीतील समाजबांधवांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी नितेश गट्टीवार, अनिल मोते, दिवाकर ताजणे, बबनराव श्रिकुंटवार, सुधीर गडपायले, राजेश मानपल्लीवार, सुधाकर लोणारे, प्रमोद वाकुडकर, शांताराम मानपल्लीवार, रूपेश कोतकोंडावार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!