सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंती निमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॅार युनिटी’ तसेच ‘डिजिटल एकता मॅरेथॉन’ चे आयोजन.

0
IMG-20261031-WA0219
Spread the love

 

IMG 20261031 WA0217

गडचिरोली:-

• वरिष्ठ अधिकारी, जवान, युवक-युवती, नागरिक व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसह एकूण 1000 हुन अधिक स्पर्धेकांचा मॅरेथॉनमध्ये सहभाग

• पोलीस मुख्यालय, उपमुख्यालयासह सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे करण्यात आले रन फॉर युनिटी-मॅरेथॉनचे आयोजन

• विजेत्या स्पर्धकांना करण्यात आले रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रांचे वितरण

• एकता दिनाचे औचित्य साधून सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे घेण्यात आली चित्रकला स्पर्धा

• सायबर सुरक्षा जनजागृती महिन्याच्या अनुषंगाने ‘ डिजिटल एकता मॅरेथॉन’

दरवर्षी 31 ऑक्टोंबर रोजी देशभरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जात असते यासोबतच हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांमध्ये एकता, अखंडता आणि बंधुभावाची भावना दृढ करण्यासाठी तसेच संविधानात्मक मुल्यांचे जतन करण्यासाठी एकता दिनाचे औचित्य साधून तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंती निमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता सह सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे आज दिनांक 31 ऑक्टोंबर 2026 रोजी रन फॉर युनिटी – मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. तसेच गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 01 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 सायबर सुरक्षा जनजागृती महिना साजरा करुन नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्राविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी डिजिटल एकता मॅरेथान चे देखिल आयोजन करण्यात आले.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दि. 31 ऑक्टोंबर 2026 रोजी सकाळी 07.00 वा. पोलीस मुख्यालय गडचिरोली ते हॉटेल लॅडमार्क 05 कि.मी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. सदर मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांनी हिरवी झेडी दाखवून केले. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वरिष्ठ पोलीस अधिका­यांसह पोलीस अधिकारी/अंमलदार, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच विशेष म्हणजे या वर्षी पहिल्यांदाच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी एकता मॅरेथॉन मध्ये आपला सहभाग नोंदविला. सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी धावपटूंनी एकात्मतेचा संदेश देणारे फलक हातात घेऊन उत्साहाने धाव घेतली. तसेच सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने धाव घेत सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी पोलीस बॅड पथकाच्या वतीने राष्ट्रभक्तीपर धून वाजवून स्पर्धकांचे मनोबल वाढविले.

यासोबतच शहिद पांडु आलाम सभागृह येथे आयोजीत कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रीय एकतेची शपत घेऊन सहभागी स्पर्धकांपैकी प्रथक, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या युवक-युवतींना पोलीस अधीक्षक गडचिरोली  एम. रमेश यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी आत्मसमर्पित सदस्य आणि जेष्ठ नागरिकांना देखिल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यासोबत एकता दिनानिमित्त पोलीस अधीक्षक गडचिरोली  एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच मंत्रालयीन स्टाफ यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रीय एकता शपथ’ घेण्यात आली. तसेच नागरिकांनी देशाचे एकता व अखंडता जोडण्यासोबतच सायबर गुन्ह्रंापासून सावध राहावे ऑनलाईन फसवणूक व सोशल मिडियाचा सुरक्षीत वापर तसेच सायबर गुन्ह्रांपासून स्वत:चे सरंक्षण कसे करावे कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत आपला ओटीपी बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती शेअर करु नये. याबाबतचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आला. तसेच सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्प लाईन क्र. 1930 वर संपर्क साधावा.  असे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. मॅरेथॉन संपल्यावर सर्व सहभागींना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यासोबतच सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर सुद्धा सदर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन, या मॅरेथॉन स्पर्धेसोबतच सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “या मॅरेथॉनचा उद्देश केवळ धावणे नसून, जिल्ह्रातील नागरिकांच्या मनात एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना दृढ करणे आहे. गडचिरोली जिल्हा माओवाद मूक्त झाल्यानंतर आज अतिदुर्गम बिनागुंडा, बंगाडी, फुलनार, तुमरकोठी या सारख्या ठिकाणी देखिल राष्ट्रीय एकता मॅरेथॉन आयोजीत करण्यात आली आहे, ही निश्चितीतच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गडचिरोली जिल्ह्रातील प्रत्येक नागरिक, विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी व अंमलदार एकतेच्या या संदेशाचा भाग बनतो आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्रात आता सशक्त पिढी घडणार अशी आशा व्यक्त करुन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी सर्वाचे मी अभिनंदन करतो.”

सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक  एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) . कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  गोकुल राज जी., प्रभारी सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली . सुयश सिंग तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान)  सुनिल उईके, हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदार तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!