सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल २ नोव्हेंबरला गडचिरोलीत; विविध विभागांच्या कामकाजाचा घेणार आढावा.
गडचिरोली, दि. १ नोव्हेंबर : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी १२ ते सायंकाळी ६.३० या वेळेत त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक होणार आहे.
सायंकाळी ६.४० ला विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री सोयीनुसार रामटेक कडे प्रयाण.

