आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये विजय दैवळकरची सुवर्णझेप; महेंद्र ब्राम्हणवाडेंकडून अभिनंदन
नागभीड : आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून नागभीडचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करणारे युवा खेळाडू विजय संजय दैवळकर यांची महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भेट घेऊन त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

विजय दैवळकर यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे नागभीडच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, परिसरातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे.
यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विजय दैवळकर यांच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत भविष्यातही देशाचे नाव उंचवावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नागभीड तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी, राजेंद्र मेश्राम सर, हरीश मुळे, विजय अमृतकर, हेमंत गुरफुडे तसेच दैवळकर कुटुंबीय उपस्थित होते.

