चिकमारा(नागभीड) येथे मस्कऱ्या गणपती उत्सवाला महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांची सदिच्छा भेट; युवकांशी साधला संवाद.
नागभीड:-

मस्कऱ्या गणपती उत्सवानिमित्त नवतरुण गणेश उत्सव मंडळ चीकमारा ता. नागभीड येथे महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि मंडळातील पदाधिकारी, युवक, महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी उपस्थितांशी विविध विषयांवर चर्चा करून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना एकत्र येण्याची, आपले विचार मांडण्याची आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. अशा उत्सवांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, त्यांच्या पुढाकारातून गावात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळू शकते. युवकांनी आपल्या अंगभूत कलागुणांचा विकास करून समाजातील सकारात्मक कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले.
गावाच्या सामाजिक जीवनात युवकांची भूमिका महत्त्वाची असते. युवकांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करत संघटितपणे काम करावे आणि गावातील विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. मंडळाच्या माध्यमातून युवकांना एकत्र येऊन काम करण्याची संधी मिळते. या संधीचा उपयोग समाजातील चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी नागभीड तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी, अमर नवघडे, विजय अमृतकर, हरीश मुळे, मिलिंद खोब्रागडे,कुणाल मूलमुले, चेतन भोयर, बडी साहेब, अमोल भोयर, आदित्य गोंगल, समीर मोरांडे, कुशल मोरांडे,शुभम चनेकर सह नवतरुण गणेश उत्सव मंडळाचे सदस्य, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

