ब्रह्मपुरीत लोकशाहीच्या रक्षणासाठी एल्गार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; शेकडोंचा महामोर्चा.

ब्रह्मपुरी, दि. ९ ऑक्टोबर : लोकशाहीचे संरक्षण, मतदानाचा अधिकार अबाधित राखणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी ब्रह्मपुरीत शुक्रवारी जनआक्रोशाचा आवाज बुलंद झाला. ‘आम्ही भारतीय लोक, ब्रह्मपुरी’च्या वतीने आयोजित लोकशाही बचाव महामोर्चात शेकडो विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आम्ही भारतीय लोक ब्रह्मपुरी यांच्या द्वारे निघालेल्या या महामोर्चातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची, EVM ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची आणि SIR प्रक्रिया रद्द अथवा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली. महामोर्चाच्या समारोपानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) आणि तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
व
‘लोकशाहीशी तडजोड नको’; आयोजकांची ठाम भूमिका

निवडणूक प्रक्रिया ही भारतीय लोकशाहीचा कणा असून ती निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी संबंधित घटनात्मक संस्थांनी पारदर्शकतेने काम करावे आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, अशी भूमिका आयोजकांनी मांडली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि चौकशीत गंभीर गैरप्रकार किंवा कायद्याचे उल्लंघन सिद्धव झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
“हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक द्वेषातून किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी नाही. भारतीय संविधान, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत,” अशी भूमिका आयोजक सोनू नागतोडे , तेजस दोनाडकर, आदित्य बोरकर यांनी मांडली. लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवायचा असेल, तर निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
EVM हटवा, मतपत्रिका आणा; SIR रद्द करण्याची मागणी
महामोर्चाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच SIR (Special Intensive Revision) प्रक्रिया रद्द अथवा स्थगित करावी आणि मतदार यादीतील बदल करताना पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या प्रक्रियेमुळे कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार बाधित होऊ नये, याची शासन आणि संबंधित संस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आयोजकांनी नमूद केले. निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची स्वतंत्र समीक्षा करावी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.व
महामोर्चाच्या प्रमुख मागण्या
महामोर्चाच्या माध्यमातून आयोजकांनी पुढील मागण्या प्रशासनासमोर मांडल्या :
१. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी.
२. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा; चौकशीत गंभीर गैरप्रकार किंवा कायद्याचे उल्लंघनb सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कारवाई करून अटकेची कार्यवाही करावी.
३. आगामी निवडणुकांमध्ये EVM ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात यावे.b
४. SIR प्रक्रिया रद्द अथवा स्थगित करून मतदार यादीतील बदलांसाठी पारदर्शक प्रक्रिया राबवावी.
५. निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची स्वतंत्र समीक्षा करून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करावे.
६. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवून कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची खात्री करावी.
विविध राजकीय पक्षांचे मार्गदर्शन व सहकार्य
या महामोर्चाच्या आयोजनासाठी सोनू भाऊ नाकतोडे अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस ब्रह्मपुरी , आदित्य बोरकर, राहुल सोनटक्के , तेजस दोनाडकर ,रोहित मेश्राम, होमराज लोणबले , प्रिन्स नंदुरकर, डॅनी शेंडे , सुरज मेश्राम, मोहन मिसार, शुभम कावळे, मनीष पारधी, शरद बारसागडे, गणेश बघमारे, विवेक राऊत, श्रीकांत मेश्राम, स्वप्निल राऊत, अतुल राऊत, अमित कन्नाके यांनी या महामोर्चाचे यशस्वी आयोजन केले व तसेच
तसेच काँग्रेसचे तालुकाप्रमुख खेमराज तिडके , थाणेश्वर कायरकर , राजेश कांबळे, जीवन बागडे , हितेंद्र जी राऊत , सुधाकर पोपटे , सपना बल्लारपुरे , पुष्पलता पोपटे, हेमलता सिंहगडे , माधुरी उपासे, रंजना बोराडे, वकार खान , पुष्पांकर बांगरे, सोमेश्वर उपासे , गोलू भुते , गाझी पटेल, कॉम्रेड विनोद झोडगे, युवासेनेचे आदित्य लोखंडे, प्राचार्य सुमेध वालदे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख नरेंद्र गाडगीळवार, राहुल भोयर, विहार मेश्राम , मानस गेडाम ,युगम कुकडे, निकिता राऊत, लक्ष्मी उरकुडे , प्रणाली बघमारे
ब्रह्मपुरीतील अनेक विद्यार्थी , विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध राजकीय विचारधारांतील प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला . लोकशाही आणि निवडणूक सुधारणांच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे चित्र या महामोर्चातून दिसून आले.
यावेळी ‘लोकशाही वाचली पाहिजे—मतदानाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे’, ‘EVM हटवा—मतपत्रिका आणा’ आणि ‘निष्पक्ष निवडणूक—मजबूत लोकशाही’ अशा घोषणांद्वारे आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
SDO आणि तहसीलदारांना निवेदन; व्यापक आंदोलनाचा इशारा
महामोर्चाच्या समारोपानंतर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. निवेदनातील मागण्यांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आयोजकांनी केली.
लोकशाहीचे संरक्षण हा केवळ राजकीय पक्षांचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित प्रश्न आहे, अशी भूमिका आयोजकांनी मांडली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने अधिक व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही युवकांच्या वतीने देण्यात आला.
विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या सहभागामुळे ब्रह्मपुरीतील या महामोर्चातून निवडणूक सुधारणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

