आनंददायी शनिवार च्या निम्मित्ताने विश्वशांती विद्यालयात राखी तयार करण्याची स्पर्धा उत्साहात, विद्यार्थिनीनी बांधली झाडाला राखी ,

0
IMG-20260829-WA0114
Spread the love

मूल/मारोडा –  रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून आज आनंददायी शनिवार च्या निम्मित्तने विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, मारोडा,मूल येथे विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलाकौशल्य तसेच भारतीय सण-परंपरांविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी रंगीत धागे, मोती, मणी, रिबीन, कागद, सजावटीच्या वस्तू आदी साहित्याचा कल्पकतेने वापर करून विविध आकर्षक राख्या तयार केल्या. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेनुसार सुंदर आणि मनमोहक राख्या साकारल्या.

IMG 20260829 WA0098
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीच्या विविध प्रकारच्या राख्या विद्यार्थ्यांनी तयार केल्याने विद्यालयाचा परिसर रंगीबेरंगी आणि आनंदमय झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून आला.विद्यालयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता, स्वावलंबन, कलात्मकता आणि सण-उत्सवांविषयीची जाणीव विकसित होण्यास मदत होते.विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारी ठरली.यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गाडेवार सर तसेच शिक्षक ,शिक्षिका , प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

IMG 20260829 WA0116
विद्यार्थिनीनी बांधली झाडाला राखी
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, मारोडा मूल येथे विद्यार्थिनींनी झाडांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. झाडे ही आपली जीवनदायिनी असून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी विद्यार्थिनींनी दिला. विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे शिक्षकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!