कृष्णनगर येथील फुटबॉल स्पर्धेला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट; खेळाडूंना दिल्या शुभेच्छा.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

​चामोर्शी (जि. गडचिरोली), दि. २८ ऑगस्ट २०२६:

चामोर्शी तालुक्यातील कृष्णनगर येथे गुरुदेव स्पोर्टींग क्लबच्या वतीने दिं. २४ ऑगस्ट २०२६ पासून ‘ग्रामीण स्तरीय फुटबॉल प्रतियोगिता’ आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट देऊन सामना पाहिला आणि खेळाडूंचे मनोबल वाढवले.

​उपस्थित खेळाडू व नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले, आज “रक्षाबंधन हा पवित्र आणि आनंदाचा सण आहे. या पावन प्रसंगी मी सर्व कृष्णनगर वासीयांना शुभेच्छा देतो. कृष्णनगर येथे दरवर्षी फुटबॉल स्पर्धेचे उत्तम आयोजन केले जाते. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मी नेहमी येथे उपस्थित राहतो. फुटबॉल खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते, आत्मविश्वास वाढतो आणि संघभावना विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व युवकांनी शिक्षणासोबतच खेळालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.” या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला आहे यासोबतच सर्व खेळाडूंना सुभेच्छा देतोय असे प्रतिपादन मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले.

​या प्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, भाजप तालुका अध्यक्षा रोशनीताई वरघंटे, फुटबॉल मंडळाचे अध्यक्ष रजनीकांत बाला, उपाध्यक्ष अभिजित गाईन, रतन सरकार, सुजित मिस्त्री, उत्पल बाढई यांच्यासह परिसरातील नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!