एकता परेडमध्ये सहभागी होऊन परतलेल्या गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 जवान व अधिका­यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव.

0
IMG-20261104-WA0220
Spread the love

प्रेस नोट

IMG 20261104 WA0219

31 ऑक्टोबर रोजी केवडीया, गुजरात येथे आयोजित एकता परेडमध्ये सी-60 पथकाचे शिस्तबद्ध संचलन

गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता व विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने राष्ट्रीय एकात्मता, देशाची एकता व अखंडता यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुजरात राज्यातील एकतानगर (केवडिया) येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात आयोजित करण्यात आले होते. आयोजित राष्ट्रीय एकता परेडमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सी-60 पथकातील 200 जवान सहभागी झाले होते.
सदर राष्ट्रीय एकता परेड व कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन गडचिरोली येथे परतलेल्या या 200 जवानांचा पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या भव्य परेडमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सी-60 जवानांना सहभागी होण्याची संधी मिळणे ही जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब आहे. गेल्या दीड महिण्यांपासून गडचिरोली पोलीस दलाच्या पथकाने केवडीया, गुजरात येथे हजर होऊन शिस्तबद्ध पद्धतीने परेडचा सराव करुन उत्कृष्ट पद्धतीने या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात शिस्तबद्ध सहभाग नोंदवून गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. गडचिरोली जिल्हा हा दीर्घकाळ माओवादाच्या आव्हानाला सामोरे गेलेला जिल्हा असून, जिल्हा पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच सी-60 कमांडोंच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे जिल्ह्यात शांतता, सुरक्षितता व विकासाला चालना मिळाली आहे. माओवादविरोधी अभियानांमध्ये सी-60 जवानांनी दाखविलेले धैर्य, शौर्य, शिस्त व कर्तव्यनिष्ठा ही गडचिरोली जिल्हा पोलीस दलाची अभिमानास्पद ओळख आहे.

 

याप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांनी राष्ट्रीय एकता परेडमध्ये सहभागी झालेल्या सर्व 200 अधिकारी व जवानांचे अभिनंदन करत तसेच राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा संपूर्ण दलासाठी सन्मानाचा क्षण असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील एकता परेडमध्ये सहभागी होऊन गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावल्याबद्दल सर्व जवानांचे अभिनंदन केले. गडचिरोली जिल्ह्रातील 214 जवानांनी सर्वोच्च बलीदान देऊन तसेच सर्व जवानांनी अतिशय खडतर सेवा बजावून गडचिरोली जिल्ह्राला माओवादापासून मुक्त करत संपूर्ण देशपातळीवर स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली आहे. जवानांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करुन भुभेच्छा दिले. यासोबतच परेडमध्ये सहभागी अधिकारी व जवानांनी आपल्या अनुभवांचे कथन करताना परेडच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना, संघभावना आणि देशप्रेमाची जाणीव निर्माण झाल्याचे मनोगत व्यक्त करत वरिष्ठांकडून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व मदतीबद्दल वरिष्ठांचे आभार मानले.
या कार्यक्रमप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली . एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  गोकुल राज जी, सहा. पोलीस अधीक्षक, भामरागड . सागर भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा . राहुल मडावी, सहा. समादेशक, रा.रा.पो.बल. गट क्र. 18 काटोल, नागपूर  मंगेश शेलोटकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!