चामोर्शीत जेसीबीची तोडफोड; दोन अज्ञात दुचाकीस्वारांचा धुडगूस!
Oplus_131072
फॉरेस्ट ऑफिससमोर अंधाराचा फायदा घेत जेसीबीच्या काचा फोडून आरोपी पसार; मालक रमेन्द्र रेपती बाला यांचे मोठे आर्थिक नुकसान
चामोर्शी : शहरात अज्ञात दुचाकीस्वार कडून मालमत्तेच्या तोडफोडीच्या घटना वाढत असल्याचे चित्र समोर येत असतानाच, फॉरेस्ट ऑफिससमोर उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सायंकाळी अंधार पडताच दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी जेसीबीच्या काचा फोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत जेसीबीचे मोठे नुकसान झाले असून, मशीनचे मालक रमेन्द्र रेपती बाला (रा. श्रीनिवासपूर) यांना आर्थिक फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबी क्रमांक MH33 AC 4657 ही मशीन फॉरेस्ट ऑफिससमोर उभी होती. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी अचानक जेसीबीला लक्ष्य केले. त्यांनी मशीनच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आणि त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळावरून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या तोडफोडीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला की अन्य कोणत्या कारणामुळे जेसीबीला लक्ष्य करण्यात आले, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, भरवस्तीत अशा प्रकारे मालमत्तेची तोडफोड करून आरोपी सहज पसार होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याची चर्चा असून, मुलांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जेसीबीची तोडफोड करणारे ते दोन अज्ञात तरुण नेमके कोण? त्यांनी हे कृत्य का केले? या घटनेमागे कोणाचा हात आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आहे.
परंतु अजून गाडीमलकांनी पोलीस तक्रार नोंद केलेली नसून अश्या घटनांना आळा बसावं असं आव्हान केले आहे.

