ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे सुवर्णप्राशन संस्कार शिबिर उत्साहात संपन्न.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

बालकांच्या आरोग्यवर्धनासाठी आयुष विभागाचा स्तुत्य उपक्रम

चामोर्शी, दि. २ नोव्हेंबर २०२६ : ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे आयुष विभागाच्या वतीने लहान बालकांच्या आरोग्यवर्धनाच्या उद्देशाने सुवर्णप्राशन संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक बालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

लहान बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावी तसेच बालकांच्या आरोग्याविषयी पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पालकांना सुवर्णप्राशन संस्काराचे महत्त्व, बालकांचे आरोग्य, पोषण, स्वच्छता व नियमित आरोग्य तपासणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पात्र बालकांना वैद्यकीय मार्गदर्शनाखाली सुवर्णप्राशन देण्यात आले.

सदर शिबिराचे आयोजन डॉ. दिपनिता देवरी, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी तसेच डॉ. हुड्डा खान, युनानी वैद्यकीय अधिकारी यांच्या पुढाकारातून करण्यात आले. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालकांच्या आरोग्यविषयक काळजीबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमामध्ये ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. शिबिरामध्ये बालकांचा व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे सुवर्णप्राशन संस्कार शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

बालकांचे आरोग्य हीच समाजाची खरी संपत्ती असून, बालकांच्या निरोगी भविष्याकरिता अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. आयुष विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!