अंमली पदार्थाची अवैध वाहतूक करुन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 08 आरोपींना गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात.
Oplus_131072
प्रेस नोट

गडचिरोली:-
आरोपींकडून 01 कोटी 20 लाख रुपये किंमतीच्या 240.5 किलो ग्रॅम अंमली पदार्थासह एकूण 1 कोटी 46 लाख 10 हजार रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा व पोमके गट्टा (फु) येथील पोलीस पथकाची संयुक्त कारवाई
गडचिरोली जिल्ह्रात अवैध कारवायांना आळा घालून सूरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी विशेष निर्देश पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी दिले आहेत. याकरीता अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध व्यवसाय करणार्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश देखील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीसांकडून दिनांक 31/10/2026 रोजी उपविभाग पेंढरी (कॅम्प कारवाफा) अंतर्गत येणाया पोमके गट्टा (फु) हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 31/10/2026 रोजी पोमके गट्टा (फु) येथिल पोलीस अधिकारी व अंमलदार नाकाबंदी करीत असतांना संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत होती. नाकाबंदी दरम्यान पांढया रंगाचे स्कॉर्पिओ वाहन क्र. सी.जी 26 के 2149 या वाहनाला थांबवून वाहनाची तपासणी करत असतांना वाहनातील 03 इसम यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता वाहन चालक नामे- 01) अनिशकुमार पोंदी, रा. देवी चौक पटनमपारा, जि. सुकमा (छ.ग) व प्रवासी 02) हिमांशू नायक रा. सुकमा (छ.ग), 03) परमब परिमलदास रा. बागीचापारा जि. सुकामा (छ.ग) हे खोटी व उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याचे त्यंाच्या ओळखपत्रावरुन पोलीस पथकास लक्षात आले. यावरुन पोलीस पथकाने संशयीत इसमांची कसून चौकशी केली असता ते अवैध अंमली पदार्थ वाहतूकीसाठी पायलटींग करत असल्याची त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या पाठीमागे त्यांचे इतर तीन साथीदार नामे 04) शंकर कोसा माडवी रा. पुसमीपारा ता. जि. सुकमा (छ.ग), 05) भूपेश धनसुराम कोमरे रा. बोळको ता. कोंटा जि. सुकमा (छ.ग), 06) सुनील रामनाथ मंडावी रा. सुडीपारा वार्ड नं.01 ता. जि. सुकमा (छ.ग) हे पिकअप वाहनातून अंमली पदार्थाची वाहतूक करण्याकरीता येत आहेत. तसेच निळ्या रंगाचे चारचाकी वाहनातून अवैध अंमली पदार्थाची खरेदी करण्या करीता इसम नामे 07)अमोल बळीराम दोरगे रा. पारोडी बोरोडी ता. आष्टी जि. बीड, 08) विशाल गोवर्धन दोरगे रा. पारोडी बोरोडी ता. आष्टी जि. बीड हे देखील काही अंतरावर थांबून आहेत.
यावरुन वरील वर्णनाप्रमाणे वाहन व व्यक्तींना ताब्यात घेऊन पोमके गट्टा फु. व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी वरील आठही संशयीतांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून 12 चंुगळ्यांमध्ये असलेले अंमली पदार्थ मिळून आले. यावरुन वरील 08 आरोपींचे विरुध्द उपपोस्टे, पेंढरी येथे दिनांक 01/11/2026 रोजी अप. क्र. 60/2026, कलम 8 (क), 20 (ब) (त्त्) (क) व 29 गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून 1) एकूण 240.580 किलोग्रॅम अंमली पदार्थ अंदाजे किंमत रुपये 1,20,29,000/- 2) जुनी वापरती चारचाकी वाहन क्र सी.जी. 04 एम.जी. 0730 अंदाजे किंमत रुपये 7,00,000/- 3) जुनी वापरती चारचाकी पिकअप वाहन सी.जी 26 इ 5475 अंदाजे किंमत रुपये 8,00,000/- 4) जुनी वापरती चारचाकी स्कार्पियो वाहन क्र. सी. जी. 26 के 2149 अंदाजे किंमत रुपये 10,00,000/- 5) 08 जुने वापरते मोबाईल अंदाजे किंमत रुपये 81,000/- असा एकूण रुपये 1,46,10,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरिल आठही आरोपींना 03 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास स्था.गु.शा येथील सपोनि कपिल आगलावे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., यांचे मार्गदर्शनाखालीे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण फेगडे यांचे नेतृत्वात सपोनि. कपिल आगलावे, व पोलीस पथक तसेच पोमकेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. दयानंद भोंबे व अंमलदार यांनी पार पाडली.

