कोरेगावात आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर.

0
IMG-20260820-WA0240
Spread the love

तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी; गरजू रुग्णांना औषधे व मोफत चष्म्यांचे वाटप

कोरेगाव (ता. देसाईगंज) : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस कमिटी, देसाईगंज आणि आमदार रामदासजी मसराम मित्रपरिवाराच्या वतीने कोरेगाव येथे भव्य महाआरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिर उत्साहात पार पडले.

IMG 20260820 WA0241

या शिबिरात हृदयरोग, हाडांचे आजार, स्त्रीरोग, नेत्ररोग यांसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. नागरिकांना आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. तसेच गरजू रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. नेत्र तपासणीनंतर गरज असलेल्या नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

IMG 20260820 WA0243

यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार व तज्ज्ञ आरोग्यसेवा पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न देता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासणे आवश्यक आहे. अशा सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य सातत्याने सुरू राहावे, असे त्यांनी नमूद केले.

शिबिराला दिनेशजी कुर्जेकर, कोरेगावच्या सरपंच सौ. मिमिता आळे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जीवन पा. नाट, नितीन राऊत, डॉ. सत्यम गुप्ता, सुधाकरजी मडावी, नरहरी तुमराम, नरेंद्र गजपुरे, प्रशांत किलनाके, हंसराज लांडगे, काशिनाथ ताडे, धनपाल मिसार, उमेश बानूबाकोडे, मोतीराम राऊत, सौ. शालूताई दंडवते, सौ. मिमिताताई पेंदाम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्या व आवश्यक उपचाराचा लाभ मिळाल्याने उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!