अंडर-१४ बुद्धिबळ स्पर्धेत विवान येनुगवारची चंद्रपूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची चमकदार कामगिरी.

0
IMG-20260924-WA0194
Spread the love

 

मूल | प्रतिनिधी
मूल येथील सेंट अॅन्स हायस्कूलचा विद्यार्थी विवान निखिल येनुगवार याने अंडर-१४ चंद्रपूर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
नियमित सराव, मेहनत, एकाग्रता आणि जिद्दीच्या जोरावर विवानने ही कामगिरी केली. त्याच्या यशामुळे सेंट अॅन्स हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विवानचे अभिनंदन करून नागपूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दमदार कामगिरीच्या जोरावर विवानची विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी नागपूर येथे निवड झाली आहे. बुद्धिबळातील संयम, एकाग्रता, अचूक डावपेच आणि प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत त्याने ही कामगिरी साध्य केली.
विवानच्या यशाबद्दल त्याचे बुद्धिबळ प्रशिक्षक अक्षय येनुगवार, पालक निखिल येनुगवार तसेच आजी मिनाताई येनुगवार यांनी आनंद व्यक्त केला. त्याच्या यशाबद्दल शाळा, शिक्षक, कुटुंबीय व क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विभागीय स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!