माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्याकडून सावली दौऱ्यात निलसनी पेडगाव व भान्सी येथील बाधित व गरजू कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत

0
IMG-20260919-WA0271
Spread the love

 

सावली:दि.१९ सप्टेंबर २०२६

माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी सावली तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान आपद्ग्रस्त आणि गरजू कुटुंबांला आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

दौऱ्यादरम्यान माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी पेटगांव येथे वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या वाकुडकर कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते अविनाश पाल आणि तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर यांनी माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचे लक्ष इतर दोन घटनांकडे वेधले. यामध्ये नीलसनी-पेटगाव येथील अपघातात जखमी झालेले बालाजी मेश्राम आणि भान्सी येथील रहिवासी श्री. माणिकजी भोयर यांचे अल्पशा आजाराने झालेले निधन, या दोन्ही बाबींची माहिती मिळताच माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी तत्परता दाखवत मेश्राम आणि भोयर कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून दिलासा दिला.

ही आर्थिक मदत भाजप जिल्हा सचिव सूरज किनेकर यांच्या माध्यमातून बाधित कुटुंबांपर्यंत सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी नीलसनी, पेटगाव आणि भान्सी येथील भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या या संवेदनशील आणि तात्काळ मदतीच्या भूमिकेबद्दल सावली तालुक्यातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!