चारभट्टीत श्रावण सांगता सोहळ्यानिमित्त भव्य हनुमान चालीसा पठण.
Oplus_131072
चारभट्टी, ता. लाखांदूर : पवित्र श्रावण महिन्याच्या सांगता सोहळ्यानिमित्त चारभट्टी येथील हनुमान देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने भव्य हनुमान चालीसा पठणाचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला भाविक, युवक, महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित राहून भाविक भक्तांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व विशद केले. धर्म, संस्कृती आणि परंपरा जपण्याची गरज अधोरेखित करत अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा, बंधुभाव आणि नैतिक मूल्यांची जपणूक होते, असे त्यांनी सांगितले. तरुण पिढीनेही धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजकार्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास खासदार डॉ. प्रशांत पडोळे, मोहन पंचभाई, मधुकरजी लिचडे, सदाशिवजी वलथरे, सुरेशजी ब्राम्हणकर, शीतलताई राऊत, सरपंच शैलेश रामटेके, धनराज तिरपूडे, मनीषाताई निंबाते, विद्याताई कुंभरे, वंदनाताई काळे, रसिकताई रंगारी, गंगाधरजी जीपकाटे, योगेश सलके, घनश्याम धामट, नारायण वरठे, मदनजी रामटेके, रमेश मेहंदळे, बबलू नागमोती, विनोद बळी, अजय तुमसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
हनुमान चालीसा पठणाच्या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
