चामोर्शीतील एकलव्य निवासी शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना दिले प्रोत्साहन.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

IMG 20260902 142417

चामोर्शी, दि. २ सप्टेंबर : चामोर्शी येथील एकलव्य आदिवासी निवासी शाळेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी आज भेट देऊन विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.

विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारे विविध प्रकल्प सादर केले होते. पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली.

यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सर्जनशील उपक्रमांचीही त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्यातील कौशल्ये विकसित करावीत आणि भविष्यात विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करावी, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक व सर्जनशील उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप देण्याची प्रेरणा मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!