गौरीपूर येथे फुटबॉल स्पर्धेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांची भेट; खेळाडूंना दिले प्रोत्साहन.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

चामोर्शी : पोलीस स्टेशन चामोर्शी हद्दीतील गौरीपूर येथे सुरू असलेल्या फुटबॉल क्रीडा स्पर्धेला पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांनी मैदानावर उपस्थित खेळाडू व आयोजकांशी संवाद साधून स्पर्धेची माहिती जाणून घेतली.
युवकांनी क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन आपली गुणवत्ता विकसित करावी, तसेच खेळातून शिस्त, संघभावना आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी सहभागी खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा देत उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहित केले.
गौरीपूर परिसरातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राबाबत असलेला उत्साह पाहून पोलीस निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या या भेटीमुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!