आझाद समाज पार्टीच्या मागणीची दखल; पी.आय. वाघ यांची विद्यार्थ्यांप्रती तत्परता, जिल्हा परिषद आष्टी परिसर स्वच्छ.
Oplus_131072
आष्टी प्रतिनिधी : जिल्हा परिषद आष्टी येथील परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन आझाद समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला.
या दरम्यान नाशिकांत भाऊ भसारकर, सुगत कुकुडकर, भास्कर, सूरज देवगाडे आणि कुणाल सुनटकारी यांनीही संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले.
आझाद समाज पार्टीच्या मागणीची दखल घेत पी.आय. वाघ(PI) साहेबांनी विद्यार्थ्यांप्रती तत्परता दाखवत जिल्हा परिषद आष्टी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नावर तातडीने सकारात्मक कार्यवाही केल्याबद्दल आझाद समाज पार्टीच्या वतीने पी.आय. वाघ(PI) साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी आझाद समाज पार्टी यापुढेही सातत्याने आवाज उठवत राहील, असा निर्धार युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी व्यक्त केला.
