गडचिरोली पोलीसांची अवैध गोवंश वाहतुक करण्याऱ्यावर कठोर कारवाई.
Oplus_131072
प्रेस नोट
दिनांक- 29/08/2026
02 चारचाकी वाहन व 32 गोवंशीय जनावरांसह एकूण 19,60,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
गडचिरोली जिल्ह्रातील काही असामाजीक घटकांकडून अवैध कारवाया करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पोलीस अधीक्षक गडचिरोली एम रमेश यांच्याकडून इतर अवैध व्यवसायांसोबतच अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक व विक्री करणायांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरुन काल दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन आरमोरी पोलीस पथकाने पोस्टे आरमोरी हद्दीत अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाया आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, काल दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक रात्रीच्या सुमारास पोस्टे आरमोरी हद्दीतील रात्रगस्त करीत असताना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे शेहजाद शेख रा. कुरखेडा व जमीर कुरेशी रा. गेवर्धा जि. गडचिरोली हे दोघेही आपल्या ताब्यातील चारचाकी आयसर वाहन क्र. एम 04 जी आर 3084 ने मौजा ठाणेगाव आरमोरी टी पॉईट रस्त्याने अवैधरित्या गोवंशीय जनावरे भरुन वाहतूक करणार आहेत, यावरुन स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे आरमोरी पोलीस पथकांनी मौजा ठाणेगाव आरमोरी टी पॉईट जवळ सापळा रचुन पाळत ठेवली असता, मौजा ठाणेगाव आरमोरी रोडवर दोन पायलटींग करीत असलेली चारचाकी वाहने व संशयीत चारचाकी आयसर वाहन क्र. एम.एच 04 जि.आर 0384 येताना दिसुन आली. त्यावेळेस पोलीस पथकांनी सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन आयसर वाहन थांबविले असता, वाहनातील दोन्ही इसमांनी जंगलाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी एका इसम पकडले. सदर इसमास त्याचे नाव, गाव विचारले असता, त्याने आपले नाव प्रणय समीर जांभुळकर, वय 20 वर्ष, रा. आंधळी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली असे सांगितले. यानंतर पोलीस पथकांनी सदर वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये गोवंशीय जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले होते.
यादरम्यान समोरील टी-पॉईट वर तैनातीस असलेल्या पोस्टे आरमोरीच्या पोलीस पथकाने पायलटींग करीत असलेल्या काळ्या रंगाची क्रेटा वाहनास थांबविण्याचा इशारा केला असता, चालक हा वाहन न थांबविता पळून गेला. त्याच्या पाठीमागे असलेल्या पांढया रंगाच्या स्विप्ट डिझायर वाहन क्र. सी जी 10 ए.एम.8415 या वाहनास अडथळा निर्माण करुन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सदर वाहनातील 03 इसमांनी देखिल समोर वाहन थांबवून जंगलाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस पथकानी मोठ¬ा शिताफीने तीनही इसमांना ताब्यात घेतले. त्यानंतर सदर इसमांस त्याचे नाव, ग 1ाव विचारले असता, त्यांनी आपले नाव 1) शेहबाज सलाम शेख, वय 31 वर्षे, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली, 2) शोहेब फारुक शेख, वय 27 वर्षे, व 3) शेख आकिब नासीर शेख दोघेही रा. जाफरनगर नागपूर असे सांगितले. सदर आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता, पुढे पळून गेलेल्या काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनामध्ये बसलेला इसम नामे शहजाद शेख, रा. कुरखेडा व जमील कुरेशी, रा. गेवर्धा, जि. गडचिरोली यांच्या सांगण्यावरुन आम्ही जनावर भरलेल्या आयसर वाहन क्र. एम.एच 04 जि.आर 0384 याची पायलेटींग करीत असल्याचे सांगितले. यानंतर पोलीस पथकांनी पंचांसमक्ष सदर वाहनांची तपासणी केली असता, चारचाकी आयसर वाहनामध्ये 26 गाय व 06 बैल, एकूण किंमत 5,95,000/- यासोबतच 01 आयसर कंपनीचे चारचाकी वाहन अंदाजे किंमत 10,00,000/- रुपये व 01 स्विप्ट डिझायर चारचाकी वाहन अंदाजे किंमत 3,00,000/- रुपये व 03 मोबाईल फोनसह एकूण 19,60,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांची वैद्यकीय तपासणी केली असता, 32 पैकी 04 गाय व 02 बैल असे एकूण 06 जनावरे मृत असल्याचे आढळून आले.
सदर गुन्ह्राच्या अनुषंगाने आरोपी नामे 1) शेहबाज सलाम शेख, वय 31 वर्षे, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली, 2) शोहेब फारुक शेख, वय 27 वर्षे, 3) शेख आकिब नासीर शेख दोघेही रा. जाफरनगर नागपूर, 4) प्रणय समीर जांभुळकर, वय 20 वर्ष, रा. आंधळी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली तसेच पाहिजे असलेले आरोपी 5) शहजाद शेख, रा. कुरखेडा, 6) जमील कुरेशी, रा. गेवर्धा, जि. गडचिरोली व 7) आयसर वाहन क्र. एम.एच 04 जि.आर 0384 या वाहनाचा अज्ञात चालक यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन, आरमोरी येथे अप. क्र. 380/2026 कलम 11 (1) (अ),11 (1) (ड), 11 (1) (इ), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 सहकलम 5 (अ), 5(ब), 9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 सहकलम 3 (5), 325 भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक 01 ते 04 यांना अटक करण्यात आली असून मा. न्यायालयापूढे हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. यासोबतच पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध सुरू असून गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. गणेश कांबळे, पोस्टे आरमोरी हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी, सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे व पोस्टे आरमोरी पोनि. सचिन झनक यांचे नेतृत्वात स्थागुशाचे सपोनि. भगतसिंग दुलत, पोहवा/सुधाकर दंडीकवार, पोअं/बोईना चापोअं/लोणारे तसेच पोस्टे आरमोरीचे सपोनि. प्रताप लामतुरे, पोहवा/मेश्राम, पोअं/तांगडे यांनी केलेली आहे.
