मार्कंडादेव येथे ७ सप्टेंबरला भव्य महाअभिषेक सोहळा; नियोजनासाठी ३० ऑगस्टला बैठक व पत्रकार परिषद.
नियोजन बैठक व पत्रकार परिषद
शेतकरी नेते श्री. महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी श्री जगन्नाथ महाराज मंदिर, मार्कंडादेव येथे विशेष नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीचे वेळापत्रक
🕐 दुपारी १.०० वाजता – शेतकरी बांधवांची नियोजन बैठक
🕑 दुपारी २.०० वाजता – पत्रकार परिषद
📍 स्थळ : श्री जगन्नाथ महाराज मंदिर, मार्कंडादेव
तरी या महत्त्वपूर्ण नियोजन बैठकीस शेतकरी बांधवांनी तसेच पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
