कुरखेडा पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; २.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

कुरखेडा | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा मोर्चा अधिक तीव्र केला आहे. कुरखेडा पोलिसांनी वडसा-कुरखेडा मार्गावर सापळा रचून चारचाकी वाहनातून वाहतूक केली जात असलेली देशी-विदेशी दारू जप्त केली. या कारवाईत दारूसह मारुती सुझुकी रिट्झ वाहन असा एकूण २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
२७ ऑगस्ट रोजी रात्रीची कारवाई
दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री गस्तीवर असलेल्या कुरखेडा पोलिसांना अवैध दारू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी वडसा-कुरखेडा मार्गावर सापळा लावला. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी रिट्झ कारला थांबवून झडती घेण्यात आली.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी तत्काळ दारूसाठा आणि वाहन ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमाल असा—
देशी दारू – २० बॉक्स, २,००० नग – ₹१,२०,०००
रॉयल स्टॅग विदेशी दारू – ९६ नग – ₹३८,४००
सह्याद्री गोल्ड विदेशी दारू – ४८ नग – ₹१९,२००
मारुती सुझुकी रिट्झ – ₹१,००,०००
एकूण – ₹२,७७,६००
या प्रकरणी सौरभ संतोष डहाळे आणि मोहन लांजेवार यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात अप. क्र. १९३/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा पोलिसांच्या पथकाने केली.
अवैध दारू वाहतूकदारांचे धाबे दणाणले
कुरखेडा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अशा बेकायदेशीर व्यवसायांना थारा दिला जाणार नसून, अवैध दारूविरोधातील मोहीम यापुढेही अधिक कठोरपणे सुरू ठेवण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!