ईदच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी पोलिसांचा रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिस दल सज्ज.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

चामोर्शी : उद्या होणाऱ्या ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी चामोर्शी पोलिसांच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला.

ईदचा सण शांततेत, उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील प्रमुख मार्ग तसेच संवेदनशील भागांतून पोलिसांनी संचलन करत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश दिला.

चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरून अफवा, भ्रामक किंवा चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

ईद सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!