वाढदिवसाचा खर्च टाळून वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदतीचा हात; रजनीकांत मोटघरे यांचा माणुसकीचा उपक्रम.

0
IMG-20260822-WA0139
Spread the love

गडचिरोली | दि. २२ ऑगस्ट २०२६

वाढदिवसाचा जल्लोष आणि अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला. चामोर्शी रोड, गडचिरोली येथील वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ज्येष्ठ महिला व पुरुषांशी आपुलकीने संवाद साधण्यात आला.

वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जीवनावश्यक वस्तू मिळाल्याने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.

यावेळी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, रजनीकांत मोटघरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष नंदू वाईलकर, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, हरबाजी मोरे, शंकरराव सालोटकर, महादेवजी भोयर, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच आनंद पारधी, हेमंत मोहितकर, मोहन वरगंटीवार, पुष्पराज उंदीरवाडे, दिनेश सिडाम, पुरुषोत्तम बावणे, जगदीश वरगंटीवार, नगरसेविका मेघा वरगंटीवार, बांबोळे, नगरसेविका मनीषा खेवले, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, पुष्पलता कुंमरे, सरचिटणीस माधुरी मडावी, कविता उराडे, रिता गोवर्धन, शितल ठवरे, मंजू आत्राम, आशा वेलादी, रोहिणी मसराम, पटोती ताई व डोईजड ताई आदी उपस्थित होते.

“वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी,” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. वाढदिवस सामाजिक जाणीव जपत साजरा करण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!