राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन; आधुनिक भारताच्या निर्मितीतील योगदानाचे स्मरण.
Oplus_131072
गडचिरोली | दि. २१ ऑगस्ट २०२६ : भारताचे माजी पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांनी देशाच्या विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान, संगणकीकरण, दूरसंचार तसेच युवकांच्या सहभागाला चालना देत आधुनिक भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचे, राष्ट्रसेवेचे आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच स्वर्गीय राजीव गांधी यांनी पाहिलेले आधुनिक, प्रगत आणि सक्षम भारताचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
कार्यक्रमाला नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष नंदू वाईलकर, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, हरबाजी मोरे, शंकरराव सालोटकर, महादेवजी भोयर, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे यांच्यासह आनंद पारधी, हेमंत मोहितकर, मोहन वरगंटीवार, पुष्पराज उंदीरवाडे, दिनेश सिडाम, पुरुषोत्तम बावणे, जगदीश वरगंटीवार, नगरसेविका मेघा वरगंटीवार, बांबोळे, नगरसेविका मनीषा खेवले, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, पुष्पलता कुंमरे, सरचिटणीस माधुरी मडावी, कविता उराडे, रिता गोवर्धन, शितल ठवरे, मंजू आत्राम, आशा वेलादी, रोहिणी मसराम, पटोती ताई, डोईजड ताई यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
