प्रतिबंधित सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा­या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक.

0
IMG-20260917-WA0199
Spread the love

                               प्रेस नोट

गडचिरोली:दि. 17/09/2026

• स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे आरमोरी यांच्या संयुक्त कारवाईत एकूण 45 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

• गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कारवाई

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशिर प्रतिबंध केला आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात अवैध व्यवसाय करणा­यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचेकडून गडचिरोली जिल्ह्रातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें यांना देण्यात आले आहेत. यावरुन काल दिनांक 16 सष्टेंबर 2026 रोजी गडचिरोली पोलीसांकडून सुगंधित तंबाखूची अवैधपणे वाहतूक करणा­या आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, काल दिनांक 16 सष्टेंबर 2026 रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा कुरखेडा ते आरमोरी रस्त्यावर एक संशयीत सहाचाकी प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू साठा वाहतूक करणार आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मिळालेली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मौजा कुरखेडा ते आरमोरी रोडवर सापळा रचून पाळत ठेवली असता, एक आयशर सहाचाकी ट्रक संशयास्पदरीत्या येताना दिसून आला. त्यावेळी पोलीस पथकाने सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन सदर वाहनास थांबविले. त्यानंतर सदर वाहनाची पाहणी केली असता खालीलप्रमाणे वर्णन असलेला 1) 13 पांढ­या रंगाच्या चुंगळीमध्ये बागबान चेवीग टोबॅको चे 520 बॉक्स, प्रती बॉक्स 2700/- रुपये प्रमाणे असे एकूण 14,04,000/- रुपये, 02) 60 पांढ­या रंगाच्या चुंगळीमध्ये डीजे प्रीमीयम क्वालीटी सुगंधीत तंबाखू चे 1320 पाऊच, प्रती पाऊच विक्री किंमत 450/- रुपये प्रमाणे असे एकूण 5,94,000/- रुपये, 03) 80 पांढ­या रंगाच्या चुंगळीमध्ये झेड ब्लॅक प्रीमीयम क्वालीटी सुगंधीत तंबाखू चे 1600 पाऊच, प्रती पाऊच विक्री किंमत 350/- रुपये प्रमाणे असे एकूण किंमत 5,60,000/- रुपये, 04) 60 पांढ­या रंगाच्या चंुगळीमध्ये क्रेज सुगंधीत तंबाखू चेे 1320 पाऊच, प्रती पाऊच विक्री किंमत 350/- रुपये प्रमाणे असे एकूण 4,65,000/- रुपये, 05) आयशर कंपनीचा मालवाहू सहाचाकी ट्रक वाहन क्र. सीजी 08 झेड 8792 अंदाजे किंमत 15,00,000/- असा एकूण 45,20,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. यावरुन सदर वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा असल्याचे निदर्शनास आले. सदर मुद्देमालाबाबत खात्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधण्यात आला. तसेच ट्रकसह मिळून आलेला सर्व मुद्देमाल पंचनामा कारवाई करुन वाहन पोलीस ठाणे आरमोरी येथे आणण्यात आले. तेथे उपस्थित अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी पंचासमक्ष वाहनचालकास त्याचे नाव व गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव शाहु धर्मेशकुमार इंदेरमन, वय 28 वर्षे, रा. जोशीलमती, गेंदाटोला, जि. राजनांदगाव, छत्तीसगड असे सांगितले. सदर वाहन चालकास अधीक विचारपूस केली असता, सदर माल हा टेमन बेदराम साहू. रा. जोशीलमती, जि. राजनांदगाव (छ.ग) याचा असल्याचे सांगितले.

यावरुन सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोलीचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सुरेश तोरेम यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन आरमोर येथे आरोपी 1) शाहु धर्मेशकुमार इंदेरमन, वय 28 वर्षे, 2) पाहिजे आरोपी नामे- टेमन बेदराम साहू. रा. जोशीलमती, जि. राजनांदगाव (छ.ग) यांचेविरुध्द अपराध क्रमांक 413/2026 कलम – 123, 223, 274, 275, 3(5) भारतीय न्याय संहिता-2023 सहकलम – 59(i), 26(2)(i) (iv), 27(3)(e), 3(1)(zz)(iv) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येऊन एका आरोपीस अटक करण्यात आली असून मा. न्यायालया समोर हजर करण्याची तजविज ठेवली आहे. तसेच पाहिजे आरोपीचा शोध घेणे चालू आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि प्रताप लामतुरे, पोस्टे आरमोरी हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली  एम. रमेश, अपर पोलीस (अभियान), . कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी., सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली  अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस निरीक्षक . अरुण फगडे, तसेच पोलीस स्टेशन आरमोरी चे प्रभारी अधिकारी सचिन झनक यांच्या नेतृत्वात पोउपनि/ विश्वभंर कराळे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!