रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आरमोरी पोलिसांचा पुढाकार; स्वतः उतरले रस्त्यावर.

0
FB_IMG_1789625848406
Spread the love

 

आरमोरी, दि. १६ सप्टेंबर २०२६ : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी आरमोरी पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः पुढाकार घेतला. पोलिसांनी रस्त्यावर उतरून सिमेंट-काँक्रीटच्या सहाय्याने खड्डे बुजविण्याचे काम केले.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार तसेच इतर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आरमोरी पोलिसांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन खड्डे बुजविले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरून केलेल्या या कामाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे कौतुक होत असून, या उपक्रमाची परिसरात तसेच सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊ नयेत आणि नागरिकांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या या पुढाकारामुळे पोलिस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!