गडचिरोलीच्या क्रीडा विकासाला मोठी चालना; क्रीडा संकुलाच्या टप्पा क्र. २ साठी ₹८०.१२ कोटी मंजूर.

0
gadchiroli_krida_sankul_under_50kb
Spread the love

गडचिरोली | दि. २१ ऑगस्ट २०२६

गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक २ साठी तब्बल ₹८० कोटी १२ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या निधीतून जिल्ह्यात अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यात येणार असल्याने गडचिरोलीच्या क्रीडा विश्वाला मोठी चालना मिळणार आहे.

क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यात ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, स्विमिंग पूल, खेळाडूंसाठी हॉस्टेल, आधुनिक स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, प्रेक्षकांसाठी गॅलरी, कंपाउंड वॉल यासह अत्याधुनिक क्रीडा व पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या मंजुरीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि सरावाच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गडचिरोलीतील खेळाडूंना संधी मिळण्याचा मार्ग अधिक मजबूत होणार आहे.

दरम्यान, या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीबद्दल माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

गडचिरोलीच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीने क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक २ साठी मिळालेली ही मंजुरी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!