शेती आणि जिल्हा वाचवण्यासाठी मार्कंडादेव येथे ७ सप्टेंबरला महाअभिषेक सोहळा.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आवाहन.

गडचिरोली/चामोर्शी | दि. २० ऑगस्ट २०२६

शेती, शेतकरी आणि गडचिरोली जिल्ह्याच्या भवितव्यासाठी श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथे महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर देवस्थान, मार्कंडादेव येथे हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.

या महाअभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून शेतीचे संरक्षण, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हित तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रार्थना व संकल्प करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास जिल्ह्यातील शेतकरी बांधव, कष्टकरी, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“शेती आणि जिल्हा वाचवण्यासाठी चला, या पवित्र संकल्पात सहभागी होऊया!” असा संदेश आयोजकांच्या वतीने देण्यात आला आहे.

महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!