शिवणीजवळील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहतुकीचा वेग मंदावला.

0
IMG_20260818_231200
Spread the love

 

मोठ्या वाहनांसह एसटी बस, दुचाकी व कारचालक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

 

जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली(शिवणी) : शिवणीजवळील पुलावरील रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ट्रक, अवजड वाहने, महामंडळाच्या बसेस, दुचाकी तसेच कारची वाहतूक होते. मात्र पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

IMG 20260818 231226
रस्त्याची कामे सुरू असली तरी काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
काम पूर्ण होण्यास आणखी वेळ लागणार असल्यास, तोपर्यंत मुरूम व गिट्टी टाकून खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य करावा, अशी जोरदार मागणीही वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाने नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!