गडचिरोलीत गोवर्धन चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; डॉ. अशोक नेते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव.
Oplus_131072
भाजप कामगार आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
गडचिरोली | दि. १८ ऑगस्ट २०२६ : भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सचिव, सामकी माता विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश सचिव गोवर्धनजी चव्हाण यांचा वाढदिवस गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या वाढदिवस सोहळ्यास माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून गोवर्धन चव्हाण यांना पुष्पगुच्छ देत तसेच मिठाई भरवून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. अशोक नेते यांनी गोवर्धन चव्हाण यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत, त्यांचे आयुष्य सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्याने परिपूर्ण व्हावे तसेच त्यांना उदंड व दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.

या सोहळ्याला भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे, शहराध्यक्ष तथा न.प. सभापती अनिल कुनघाडकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, सभापती हर्षल गेडाम, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, किसान मोर्चाचे शहर महामंत्री बंडू झाडे यांच्यासह सामाजिक नेते प्रकाश अर्जुनवार, संजय बारापात्रे, दत्तू माकोडे, देवाजी लाटकर, रमेश मूरमूरवार, दिनेश नवघडे, नरेश हजारे, अनिल देवोजवार, मेघश्याम बावणे, प्रकाश ताकसांडे, एन.डी. चलाख आणि विजय शेंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोवर्धन चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
