विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी मनविसेचे आवाहन; चामोर्शीत सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0
IMG-20260816-WA0050
Spread the love

गडचिरोली/चामोर्शी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) गडचिरोली जिल्हा व चामोर्शी तालुका शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चामोर्शी शहरात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सदस्य नोंदणी शिबिरात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मनविसेचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, महाविद्यालयीन सुविधा, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मनविसे सातत्याने आवाज उठवत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी मनविसेशी जोडले जावे, असे आवाहन करण्यात आले.

ऑफलाईनसोबत ऑनलाईन नोंदणीचीही सुविधा

नोंदणी अभियानात प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनविसेने ऑनलाईन सदस्य नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही या अभियानात सहभागी होता येत आहे.

“विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्यायहक्काच्या लढ्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावे व मनविसेचे सदस्य व्हावे,” असे आवाहन मनविसेच्या गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले.

या सदस्य नोंदणी शिबिरादरम्यान मनविसेचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. चामोर्शीत सुरू असलेल्या या अभियानामुळे विद्यार्थी संघटनात्मक चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!