आ.रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप व चष्मे वितरण.

0
IMG_20260816_203212
Spread the love

 

आरमोरी प्रतिनिधी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका काँग्रेस कमिटी, आरमोरी तथा आमदार रामदास मसराम मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी वैरागड येथील श्री. किसनजी खोब्रागडे महाविद्यालयाच्या आवारात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हृदयरोग, हाडांचे विकार, स्त्रीरोग आणि नेत्ररोग यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच रक्तदाब व मधुमेह तपासणी, आवश्यक औषधांचे मोफत वितरण तसेच गरजू नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिरासाठी येताना नागरिकांनी आधार कार्ड तसेच केशरी अथवा पिवळे रेशन कार्ड सोबत आणावे, असेही आयोजकांनी कळविले आहे. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या संदेशातून निरोगी समाजाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!