चामोर्शी ग्रामीण रुग्णालय वसाहतीत नवशक्ती शारदा उत्सव मंडळाचा गरबा-दांडियाचा उत्साह!
Oplus_131072
महिलांचा गरबा लूक, पुरुषांची विविध वेशभूषा; उत्साहात साजरा झाला शारदा उत्सव

चामोर्शी : ग्रामीण रुग्णालय (वसाहत), चामोर्शी येथील नवशक्ती शारदा उत्सव महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदा उत्सवानिमित्त गरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व पुरुषांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत उत्सवाची रंगत वाढवली.
गरबा लूकमध्ये सजलेल्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गरबा व दांडियाचा आनंद लुटला. उत्साहपूर्ण वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पुरुष मंडळींनीही विविध रूपे धारण करून उत्सवात सहभाग नोंदविला. त्यांच्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवशक्ती शारदा उत्सव महिला मंडळाने उत्साहपूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा करत सांस्कृतिक परंपरा जपली. महिला आणि पुरुषांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला.
परंपरा, संस्कृती आणि सामूहिक उत्साहाचा संगम साधणारा हा शारदा उत्सव परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.


