केशवजी भांडेकर यांच्या निधनाने भाजपची मोठी हानी; डॉ. देवराव होळी यांची वालसारा येथे श्रद्धांजली.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

भांडेकर कुटुंबीयांची भेट घेत व्यक्त केल्या शोकसंवेदना; भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

गडचिरोली/चामोर्शी | १० ऑक्टोबर २०२६

चामोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते केशवजी भांडेकर यांच्या निधनाने वालसारा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्वगावी वलसारा येथे पार पडलेल्या अंत्यविधीस भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी डॉ. होळी यांनी भांडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. केशवजी भांडेकर यांच्या निधनाने भाजपने एक निष्ठावान कार्यकर्ता, अनुभवी राजकीय नेतृत्व आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे व्यक्तिमत्त्व गमावले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे स्मरण करताना, त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या आठवणी सदैव प्रेरणादायी ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.

या दुःखद प्रसंगी शोकाकुल भांडेकर कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना डॉ. होळी यांनी केली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत केशवजी भांडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करून भांडेकर कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!