डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची महेंद्र ब्रम्हणवाडे यांनी घेतली सदिच्छा भेट.
Oplus_131072
महाराष्ट्र प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा; संघटनात्मक व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा

मुंबई : टिळक भवन, मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त झालेले मा. डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची काँग्रेसचे नेते महेंद्र ब्रम्हणवाडे यांनी सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह विविध राजकीय व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची गरज, स्थानिक पातळीवरील पक्षाची स्थिती तसेच जनतेशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याबाबत विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील विविध भागांतील स्थानिक प्रश्न, जनतेच्या समस्या आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराबाबतही यावेळी चर्चा झाली. काँग्रेसची विचारधारा आणि पक्षाची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाल्याचे समजते.
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडे महाराष्ट्राची प्रभारीपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर राज्यातील पक्ष संघटनेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नांना वेग येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सदिच्छा भेटीमुळे आगामी काळातील काँग्रेसच्या संघटनात्मक वाटचालीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

