डिस्नेलँड-प्रेसिडेन्सीच्या संघाची तालुक्यावर छाप; बॅडमिंटनमध्ये पटकावले विजेतेपद

0
IMG-20261004-WA0113
Spread the love

तालुकास्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या संघाचे विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

 

गडचिरोली (चामोर्शी) : तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत डिस्नेलँड अँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूल, चामोर्शीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट सांघिक खेळ, आत्मविश्वास आणि आक्रमक रणनीतीच्या जोरावर संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली.

या विजयी संघात प्रज्योत मेडी, कार्तिक मिस्त्री, दीक्षित पट्टेमवार, स्तवन भोयर आणि सोहम पोटवार या खेळाडूंचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करत आपल्या खेळातील कौशल्याची झलक दाखवून दिली.

तालुकास्तरावर विजेतेपद मिळवल्यानंतर डिस्नेलँड-प्रेसिडेन्सी स्कूलच्या संघाची आता जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर चामोर्शीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या खेळाडूंना मिळाली असून, आगामी स्पर्धेतही त्यांच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

या यशासाठी क्रीडा शिक्षक श्रीधर रोक्कला, प्रशिक्षक प्रणय बरसागडे तसेच तालुका क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक राकेश खेवले यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे प्राचार्य जे. विलास यांनीही विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले.

संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तालुक्यातील विजयी झेपेनंतर आता जिल्हास्तरावरही दमदार कामगिरी करत चामोर्शीच्या क्रीडा क्षेत्राचा झेंडा उंचावण्याचे आव्हान या युवा खेळाडूंसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!