सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे चामोर्शी पोलिसांचे आवाहन; १९३० हेल्पलाईनवर तक्रार करण्याचे आवाहन.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

चामोर्शी : वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन चामोर्शी, गडचिरोली पोलिसांच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी नागरिकांना OTP, PIN, पासवर्ड, CVV किंवा UPI PIN कोणालाही सांगू नये, असा इशारा दिला आहे. बँक, पोलीस किंवा कोणताही शासकीय अधिकारी फोनवरून अशा गोपनीय माहितीची मागणी करत नाही, त्यामुळे अशा कॉलवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच अनोळखी लिंक, मेसेज, ई-मेल किंवा फाईल उघडू नये. ऑनलाइन व्यवहार करताना केवळ अधिकृत व विश्वासार्ह संकेतस्थळांचा वापर करावा आणि UPI, कार्ड किंवा नेटबँकिंग व्यवहार करण्यापूर्वी दुहेरी खात्री करावी, असे पोलिसांनी सांगितले.
लॉटरी, बक्षीस, KYC अपडेट, बँक खाते बंद होण्याची भीती दाखविणारे फोन किंवा जलद पैसा कमावण्याचे आमिष यांना नागरिकांनी बळी पडू नये. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत तसेच वैयक्तिक माहिती व फोटो अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर फसवणूक झाल्यास वेळ न घालवता सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर तक्रार करावी. नागरिकांनी सतर्क राहून सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस स्टेशन चामोर्शी, गडचिरोली पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!