केवळरामजी हरडे महाविद्यालयाची राष्ट्रीय स्तरावर चमक; चामोर्शीच्या तीन विद्यार्थ्यांची ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी निवड

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

गडचिरोली (चामोर्शी) : यशोदीप संस्था संचालित केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी येथील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय भारत’च्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली.
महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन रमेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बी.कॉम. तृतीय वर्षातील रिया कुणघाडकर, माधुरी मंडल तसेच एम.कॉम. द्वितीय वर्षातील गुरुदेव सोमनकर यांची या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी निवड करण्यात आली.
२२ ते २८ सप्टेंबर २०२६ दरम्यान चेन्नई येथील व्हीआयटी (VIT) चेन्नई येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘MY Bharat Chennai’ आणि VIT Chennai यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात देशाच्या विविध भागांतील युवकांचा सहभाग होता.
राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी तसेच राष्ट्रनिर्माणाची भावना युवकांमध्ये अधिक दृढ करणे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता. विविध राज्यांतील युवकांशी संवाद साधण्याची आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी चामोर्शीच्या विद्यार्थ्यांना मिळाली.
तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय उपक्रमासाठी झालेली निवड ही महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याची दखल मानली जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!