चामोर्शीची कु. परिणीता मजुमदारची महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघात निवड

0
FB_IMG_1790241043535
Spread the love

 

गडचिरोली | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात दि. २७ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित ३९ व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात कुमारी परिणीता मजुमदार हिची निवड झाली आहे.
परिणीताच्या या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल गडचिरोली जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या वतीने परिणीताचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
या स्पर्धेत परिणीता महाराष्ट्र संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करीत जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!