पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक करण्यावर भर; गडचिरोलीत काँग्रेसची बैठक.

0
IMG-20260921-WA0195
Spread the love

गडचिरोली : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे बैठक पार पडली. AICC प्रभारी महाराष्ट्र सृजन संघटन RGPRS विवेक अवस्थाजी तसेच प्रदेश अध्यक्ष RGPRS अविनाशजी उमरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामपंचायतींचे बळकटीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार आणि गावपातळीवरील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतींच्या कामकाजातील अडचणी तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरही चर्चा झाली. पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विवेक अवस्थाजी आणि अविनाशजी उमरकर यांनी मार्गदर्शन केले.

महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणाची गरज अधोरेखित केली. “पंचायत राज व्यवस्था ही ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. ग्रामसभा अधिक प्रभावी होणे, स्थानिक नागरिकांचा विकास प्रक्रियेत सहभाग वाढणे आणि गावातील प्रश्नांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या अधिकारांनुसार प्रभावीपणे काम करता यावे, तसेच गावपातळीवरील विकासकामांना गती मिळावी यासाठी संघटनात्मक पातळीवर सातत्याने प्रयत्न करण्याची भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.

बैठकीस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सौ. कुसुमताई अलाम, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, शंकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, विजय लाड, मनोज ढोरे, स्वप्निल बेहेरे, सौ. वंदनाताई बारसागडे, रवींद्र चलाख, लालाजी सातपुते, प्रफुल बारसागडे, निकेश कामिडवार, आशिष घेर, लंकेश गेंडाम, विजय राऊत, पुरुषोत्तम अर्कपटलवार, विलास चिचघरे, सुशील शहा, भूषण भैसारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!