रांगी येथे घाणीचे साम्राज्य; दवाखाना परिसरात अस्वच्छतेचा विळखा,प्रशासनाचे दुर्लक्ष.

0
IMG-20260920-WA0260
Spread the love

 

नाल्यांमध्ये साचलेले पाणी, दुर्गंधी आणि डासांचा त्रास; ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने साफसफाई करण्याची नागरिकांची मागणी

दिनांक : 20 सप्टेंबर 2026

गडचिरोली : रांगी येथील दवाखाना परिसरात हॉटेल व गॅरेजच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये पाणी साचून राहत असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाणकचरा जमा झाल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अस्वच्छतेचा त्रास नागरिकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
दवाखाना परिसरातील हॉटेल व गॅरेजजवळ असलेल्या प्रवासी निवाऱ्यामध्ये बसची वाट पाहण्यासाठी प्रवासी थांबतात. मात्र, नाल्यांमध्ये साचलेले पाणी, सडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी आणि सायंकाळच्या वेळी वाढणाऱ्या डासांमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस उशिरा आल्यास प्रवाशांना बराच वेळ या अस्वच्छ वातावरणात थांबावे लागते.
साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असून, दवाखाना परिसरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाहणी करून कारवाई करावी
रांगी ग्रामपंचायत प्रशासनाने दवाखाना परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नाल्यांमधील साचलेले पाणी, घाणकचरा व सडलेला कचरा तातडीने साफ करून हटवावा. तसेच नाल्यांची नियमित स्वच्छता करून पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
नालीलगत असलेल्या हॉटेल व गॅरेज चालकांनाही ग्रामपंचायत प्रशासनाने नोटीस देऊन कचरा नाल्यामध्ये किंवा उघड्यावर टाकू नये, अशा सूचना द्याव्यात. हॉटेल व गॅरेजमधून निर्माण होणारा घनकचरा ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीतच टाकण्याचे निर्देश देण्यात यावेत.
रांगी येथील दवाखाना परिसरातील अस्वच्छता दूर करून प्रवासी निवारा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी नागरिक व प्रवाशांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!