‘छात्रों की गूंज’च्या महा मॅरेथॉनसाठी नियोजनाला वेग; महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या उपस्थितीत बैठक.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

गडचिरोली : ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनासाठी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.
बैठकीत मॅरेथॉनचा मार्ग, सहभागींची नोंदणी, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धेत विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मॅरेथॉन शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही यावेळी आवाहन करण्यात आले.
बैठकीस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सौ. कुसुमताई अलाम, प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, शंकरराव सलोटकर, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माधव गावड, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे यांच्यासह उत्तम ठाकरे, विजय लाड, नदीम नाथानी, हरबाजी मोरे, राजेंद्र ब्राह्मणवाडे, ढीवरू मेश्राम, योगेंद्र झंजाड, रवी मेश्राम, कुणाल आभारे, देवेंद्र बांबोडे, विजय शेंडे, सुधीर बांबोळे, लक्ष्मण मेश्राम, संदीप भोयर, गजानन नैताम, रामचंद्र भांडेकर, दामोदर साखरे, अरुण मेश्राम, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, जावेद खान, सौ. कविता उराडे, सौ. शालिनी पेंदाम, सौ. रीता गोवर्धन यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!