नगरसेविका शिल्पा हेमके यांच्यावर अनधिकृत बांधकामाचा आरोप; सदस्यत्व रद्द करण्याची आझाद समाज पार्टीची मागणी.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

                          प्रेस नोट

गडचिरोली |
गडचिरोली नगरपरिषद हद्दीतील मौजा गडचिरोली येथील सर्व्हे क्रमांक ११/१ (क) मधील भूखंड क्रमांक ६६ वर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप नगरसेविका शिल्पा हेमके (गव्हारे) यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित नगरसेविकेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करून फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा सहआयुक्त (न.प. प्रशासन) यांच्याकडे करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.

निवेदनानुसार, सदर भूखंड खुल्या जागेवर निवासी वापरासाठी असताना त्याचे प्लॉट पाडून विक्री करण्यात आली. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ मधील कलम ४४ अन्वये आवश्यक परवानगी न घेता तसेच नगरपरिषदेची बांधकाम परवानगी उपलब्ध नसताना भूखंडावर पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, नगरपरिषदेकडील नोंदीनुसार सदर भूखंड नगरपरिषदेकडे गहाण असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. गहाण असलेल्या भूखंडावर बांधकाम करून त्याची विक्री केल्याने संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास बाब आणून देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तक्रारीला आठ दिवसांचा कालावधी उलटूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित नगरसेविकेवर करण्यात आलेले आरोप आणि अनधिकृत बांधकामाबाबतचे दावे अधिकृत चौकशीअंती स्पष्ट होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी आझाद समाज पार्टी यांनी करण्यात आली आहे.

“नगरसेविकेच्या अनधिकृत बांधकामाचा आरोप; शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी” कारवाई न केल्यास आझाद समाज पार्टी आंदोलनाचा इशाराही देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!