चामोर्शी पोलीस स्टेशन कडून ९ सप्टेंबरला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

 

कबड्डी, हॉलिबॉलसह आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धेचा समावेश; विजेत्यांना आकर्षक बक्षिसे

चामोर्शी : महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने जनतेशी संवाद व सलोखा अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने चामोर्शी पोलिस स्टेशनतर्फे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे होणार आहेत.
या उपक्रमात वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा, भगवान बिरसा मुंडा हॉलिबॉल स्पर्धा तसेच आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहन देतानाच आदिवासी पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
कबड्डी, हॉलिबॉल आणि रेला नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे.
या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त युवक, नागरिक आणि विविध संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चामोर्शी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी चामोर्शी पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खेळातून दमदार तरुणाई आणि संस्कृतीतून आदिवासी अस्मितेचा जागर — पोलिसांच्या या उपक्रमाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!