महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ जणांचे रक्तदान; आरोग्य तपासणीसह विविध सामाजिक उपक्रम.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

गडचिरोलीत सामाजिक बांधिलकीचा संदेश; काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

गडचिरोली : जनतेच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे तसेच सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणारे काँग्रेसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला सकाळपासूनच उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. गडचिरोली शहरासह तालुक्यातील विविध भागांतून नागरिक, युवक, महिला, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रक्तदान शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. तरुणांचा या उपक्रमातील सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

यासोबतच आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन यासह आवश्यक तपासण्या करून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला.

महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमातून सेवाभाव, सामाजिक एकोपा आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचा संदेश देण्यात आला. अशा समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा यापुढेही सुरू राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला आमदार रामदासजी मसराम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अॅड. दुशांत नामदेव किरसान, नगरसेवक सतीश विधाते, कुसुमताई अलाम, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, देसाईगंज अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जीवन नाट यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, उत्तम ठाकरे, शरद पाटील ब्राह्मणवाडे, राजेश ठाकूर, परसराम टिकले, दिलीप घोडाम, विजय लाड, अनिल कोठारे, अब्दुल पंजवानी, सुशील शहा, प्रभाकर वासेकर, विकास जेंगठे, शंकरराव सालोटकर, मनोज आखाडे, देविदास देशमुख, श्याम भाऊ नन्नावरे, संदीप भैसारे, पंढरी चौके, आदित्य सूर्यवंशी, मयूर दोडके, स्वप्निल बेहेरे, विजय राऊत, सुधीर बांबोडे, पुरुषोत्तम चिंचोळकर, रमेश मानकर, नागोराव उईके, पांडुरंग घोटेकर, सुभाष कोठारे, घेऊन मेश्राम, अनिल किरमे, मनोज बोरकर, मुन्ना सिंग चंदेल, माधवराव गावळ, कल्पनाताई नंदेश्वर, कविताताई उराडे, रीताताई गोवर्धन, कविताताई भगत, मीनलताई चिमूरकर, मनीषाताई खेवले, विनोद कुंभारे, सुभाष कुकुडकर, अखिल गेडाम, गिरीधर तितराम, प्रभाकर तुलावी, भूषण भैसारे, विलास चीजगरे, संजय बुरांडे, देवाजी काटवे, कुणाल आभारे, सुधीर चौधरी, समीर कुळे, साहिल कुळमेथे, आकाश कुंभरे, अमर नवघडे, पवन नवघरे, विजयानंद महाराज रोडे, नदीम नाथानी, रवी मेश्राम, संजय शिंपी, ज्ञानेश्वर पोरटे, हरबाजी मोरे, रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, गौरव एनपरेडडीवार, विपुल एलटीवार, अविनाश बांबोळे, जावेद खान, लालाजी सातपुते, स्वप्निल मुरस्कर, अशोक नैताम, कुणाल म्हशाखेत्री, चैतन्य उईके, योगेंद्र झंजाळ, निकेश कामीडवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, वामनराव सावसागडे, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या रक्तदान व आरोग्य तपासणीसारख्या उपक्रमामुळे उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!