गडचिरोली पोलिसांच्या तत्पर मदतीने नवजात बाळाला मिळाला तातडीने रक्तपूरवठा.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

                    प्रेस नोट

 

एटापल्ली दि. 31 ऑगस्ट

रक्ताची तातडीची गरज ओळखून पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांनी केले रक्तदान

एटापल्ली तालुक्यातील 32 वर्षीय शांता गावडे यांनी दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयामध्ये तिळ्या बाळांना जन्म दिला होता. मुदतपूर्व जन्म झाल्याने तिन्ही नवजात बालकांना विशेष वैद्यकीय देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका बाळाच्या प्रकृती खालावल्याने त्याला रक्ताची कमतरता भासल्याने गडचिरोली पोलीस दलातील पोलीस जवानांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवित बाळाला रक्त पुरवठा करुन जीवनदान दिले आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयामध्ये शांता गावडे यांनी तिन बाळांना जन्म दिला होता. मुदतपूर्व जन्म आणि कमी वजनामूळे तिन्ही बाळांवर एनआयसीयूमध्ये विशेष उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असतानाच दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी एका नवजात बाळाच्या प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. डॉक्टरांनी तातडीने दृअ रक्तगटाची आवश्यकता असल्याचे सांगितले. मात्र, त्यावेळी लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दृअ चे रक्त उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाशी तातडीने संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने पुढाकार घेत गडचिरोली रक्त केंद्राच्या सहकार्याने दृअ चे रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी ऑपरेशन सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे तसेच नागरी कृती शाखेतील महिला पोअं/आचल कुमरे यांनी सदर नवजात बालिकेसाठी स्वेच्छेने रक्तदान केले. त्यांच्या तत्पर सहकार्यामूळे बाळासाठी आवश्यक दृअ चे रक्तगटाच्या दोन बॅग उपलब्ध करून देण्यात आल्या. वेळीच रक्तगट उपलब्ध झाल्याने नवजात बाळाच्या उपचाराला मोठी मदत झाली असून बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

याप्रसंगी नवजात बाळाचे आई-वडील तसेच रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाच्या तत्परतेबद्दल आणि माणुसकीच्या भावनेतून केलेल्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे. तसेच पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांनी देखील तत्परतेने रक्तदान करणा­या पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांचे कौतूक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!