अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात सामाजिक उपक्रमांचा धडाका.
Oplus_131072
रक्तदान, वृक्षारोपण, नेत्र तपासणीसह गरजू व विद्यार्थ्यांना मदतीचा हात
चामोर्शी | प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज, ३१ ऑगस्ट रोजी, गडचिरोली, चामोर्शी, भेंडाळा, येणापूर आणि घोट येथे विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चामोर्शी येथे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि नेत्र तपासणी आयोजित करण्यात आली असून गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वितरण, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच बसस्थानक परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
येणापूर येथे रक्तदान शिबिर, तर भेंडाळा येथे रक्तदान शिबिरासह फळवाटप करण्यात येणार आहे. घोट येथे विद्यार्थ्यांना शालेय नोटबुकचे वाटप, फळवाटप आणि वृक्षारोपण असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
गडचिरोली शहरातही वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, फळवाटप, दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येत असून, विविध कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
