पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत रक्षाबंधन साजरा.

0
Oplus_131072

Oplus_131072

Spread the love

प्रेस नोट

 

दिनांक- 28/08/2026

 

  •  नवजीवन वसाहत येथे आयोजीत कार्यक्रमात 70 आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांचा सहभाग

 पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ अधिका­यांनी पोस्टे गडचिरोली, चातगाव व पोमकें गोडलवाही येथे भेट देऊन रक्षाबंधन सण साजरा केला

IMG 20260828 WA0300

गडचिरोली:-

गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपुष्टात आला असून, जिल्ह्रातील नागरिक आता माओवादाच्या भीतीपासून मुक्त होत आहेत. तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. शासनाच्या आत्मसर्मपण योजना 2005 च्या माध्यमातून आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने सर्वांगीण पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण 819 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसन व मुख्य प्रवाहात समावेशाच्या उद्देशाने करण्यात येणा­या प्रयत्नांअंतर्गत आज दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजीे गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजिवनी’ अंतर्गत पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांचे उपस्थितीत नवजीवन वसाहत, नवेगाव गडचिरोली येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

IMG 20260828 WA0298

यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान नवजीवन वसाहत, नवेगाव येथील आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पित महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी नवजीवन वसाहत येथे भेट देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. कार्यक्रमादरम्यान वसाहतीमध्ये आत्मसमर्पित महिलांनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत उपस्थित वरिष्ठ अधिकारी व सि-60 जवानांना राखी बांधली. यावेळी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांना भेट वस्तू प्रदान करुन त्यांच्या सोबत प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येत असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमादरम्यान महिला पोलीस अधिकारी यांनी देखील आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
यासोबतच पोलीस अधीक्षक गडचिरोली  एम. रमेश यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी  हर्षवर्धन बी. जे., सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली  अनिकेत हिरडे यांनी पोलीस स्टेशन, गडचिरोली, चातगाव व पोमकें गोडलवाही येथे भेट देऊन महिला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शालेय विद्यार्थीनींसोबत रक्षाबंधन सण आनंदात साजरा केला. तसेच गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील भागात सेवा देत असलेल्या अधिकारी व अंमलदार यांच्याकरीता श्रीमती. नाथीबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापीठ मंुबई, भरारी प्रतिष्ठान पुणे आणि मुंबई शहरातील विविध शालेय विद्यार्थींनींनी राखी पाठवून एक अनोखे उपक्रम राबवून गडचिरोली जिल्ह्रातील पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमप्रसंगी पोलीस अधीक्षक  एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी  हर्षवर्धन बी. जे., सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली  अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान),  सुनिल उईके, प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह)  संजय सिंह, पोनि. सिटीसी किटीळी, समाधान चव्हाण, पोनि. स्थागुशा, गडचिरोली  अरुण फेगडे, पोनि. मो.प.वि, गडचिरोली  विवेक पांडव यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!